About
आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या
नासिक घाटचे शुद्ध तांब्याचे आणि पितळाचे भांडी बनवणारे कारागीर
ओझरच्या कलाकुसरतेला 300 वर्षांची परंपरा
ओझरची पूर्वीपासूनची खरी ओळख टिकून आहे ती आजही ओझर तांबट या नावाने.. अनेकांना हा विचार पडला असणार हे तांबट नेमक काय? याचे उत्तरदेखील नावातच आहे ते म्हणजे तांब्याचे भांडे घडवणारे म्हणजे तांबट. ही परंपरा रुजली सुमारे तीनशे वर्षांपूर्वी पेशव्यांचा काळात ओझर गावातून ढोल तुटऱ्यांच्या निनादात पेशव्यांची मिरवणूक चालली असतांना तांबट लेन परिसरात ती आली असता सगळे गाव त्यात सामील होत असे. परंतु तांबट आळीतील ठोक्याच्या प्रचंड आवाजामुळे पेशव्यांनी वाजंत्री थांबविण्याची विनंती केली. कामात इतके मग्न असलेल्या लोकांना त्यांनी चावडीत (जुनी ग्रामपंचायत) बोलावून काय काम चालते हे विचारले. त्यानंतर पाहिजे ते वतन मागा देतो, असे सांगितले असता त्यांनी काहीही न मागता फक्त आमचे नाव या गावाच्या नावापुढे द्या इतकेच मागितले अन लगेच ते मंजूरदेखील झाले आणि तेथून ओझरचे नाव ओझर तांबट झाले...
काळाच्या ओघात सदर व्यवसाय मागे पडता असला तरीदेखील पूर्वापार या व्यवसायाला झळाळी दिलेल्या दिवंगत दत्तात्रयभाई यांची परंपरा अबाधित ठेवणारे नरेंद्रभाई हे हा व्यवसाय उत्तमरीत्या चालवत आहेत. कुठलीही चालत आलेली परंपरा टिकवायची असल्यास इच्छाशक्ती आणि मनोबल सकारात्मक ठेवणे महत्वाचे आहे.
Product
आमचे उत्पादन
खालील प्रमाणे कुठलीही वस्तू तयार करून मिळेल
- सर्व उत्पादन
- तांबा
- पितळ
Contact
आमच्याशी संपर्क साधा
आमचा पत्ता
745, तांबट लने, ओझर मिग नंदा दुकाना जवळ, नासिक पिन 422207
ईमेल
narendratambat1961@gmail.com
कॉल
+91 8888 3532 98
